दुख आढवयाल उंबऱ्यासारखा .. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा कविता Lyrics

 दुःख अडवायला उभऱ्यासारखा , मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कविता 

कवि :- अनंत राऊत 


दुःख अडवायला उभऱ्यासारखा ,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १

वाट चुकणार नाही जीवनभर कोणी,
एक तू मित्र कर आरशासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २

आत्महत्याच करणार नाही कोणी,
मित्र असला जवळ जर मनासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३

त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,
बस धडा मैत्री वाचण्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४

मैत्री चाटते गाय होऊन मना,
जा बिलग तू तिला वासरासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५

कवी :- अनंत राऊत


Post a Comment

0 Comments